अवसरी, (वार्ताहर) – अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे वृक्षारोपण व रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी ७२ रक्तदात्यांनी रक्तदानाचे हक्क बजावला असल्याची माहिती आंबेगाव तालुका भाजपच्या वतीने देण्यात आली.
आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष आणि अवसरी खुर्द येथील मेघश्याम भोर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण आयोजित करण्यात आले होते शिबिरात ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कापूर या वृक्षाचे रोपण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील व सरचिटणीस डॉ ताराचंद कराळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी भाजपा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक श्रीकांत देशमुख, आंबेगाव तालुका भाजपा अध्यक्ष संदीप बाणखेले, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे, माजी सरपंच कल्याण शिंदे, कल्याण टेमकर, मुरलीधर कराळे, रामदास भिकाजी टेमकर,अटल बिहारी वाजपेयी विचार मंच उपाध्यक्ष सुशांत थोरात, प्रमोद बाणखेले,
निसर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल टेमकर, शरद बँकेचे माजी संचालक शांताराम टेमकर, वैभव टेमकर, विशाल शिंदे, शिवसेना शहरप्रमुख प्रवीण टेमकर, माजी उपसरपंच निलेश टेमकर, राष्ट्रवादी काँग्रेस अवसरी खुर्द अध्यक्ष राजू भोर, सचिन ढोणे, प्रसाद कराळे, यतीन काका कुलकर्णी,विलास टेमकर, सुदाम टेमकर,सुरेश टेमकर, बाळासाहेब टेमकर, शांताराम अभंग, लक्ष्मण टेमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मेघशाम भोर व भाजपा सहकाऱ्यांनी अवसरी खुर्द मध्ये राबवलेली पी एम किसान कार्ड योजना,आभा हेल्थ कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड योजनेची दखल भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर घेतली असून मेघशाम भोर यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय असल्याचे मत शरद बुट्टे पाटील यांनी व्यक्त केले.
रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळते. आंबेगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे अध्यक्ष मेघशाम भोर यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे मत डॉ. ताराचंद कराळे यांनी व्यक्त केले. अवसरी खुर्द गावामध्ये निसर्ग प्रतिष्ठानच्या माध्यमातून संवर्धन केलेल्या दोन हजार वृक्षांना मेघश्याम भोर यांनी वृक्ष वाढीसाठी औषधे व कीटकनाशके, खते मोफत दिली आहेत, अशी माहिती निसर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल टेमकर यांनी दिली. सिद्धेश अभंग,प्रवीण भोर, ओंकार खेडकर यांनी नियोजन केले. केशव टेमकर यांनी सूत्रसंचालन तर ओंकार कराळे यांनी आभार मानले.