मोदींच्या सभेसाठी वृक्षतोड; राष्ट्रवादीची कणखर टीका

पुणे: पुणे जिल्ह्यातील भाजप-शिवसेना-रिपाइं (ए) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १७ ऑक्‍टोबरला दुपारी ४ वाजता एस.पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होणार आहे. दरम्यान, मोदींच्या सभेसाठी मैदानावर वृक्षतोड केल्याचा प्रकार समोर आलं आहे. त्यामुळे विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे.

एकीकडे २ कोटी वृक्ष लागवडीच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे प्रचार सभांसाठी झाडांची कत्तल करायची, ही भाजपाची दुटप्पी भूमिका आता उघड झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

१७ ऑक्टोबरच्या सभेसाठी ही झाडं मशीनच्या साहाय्याने कापण्यात आली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करताना भाजपा सरकारला लाज कशी वाटत नाही?, असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.