“करोना’च्या आजारावरील उपचार सोशल मीडियावर “व्हायरल’

विषाणूपासून बचावासाठी “हे’ आणि “ते’ करा…, मेसेज लागले फिरू’

पुणे – चीनमधील वुहान शहरात नवीन करोना विषाणूने हाहा:कार माजविला असून, या विषाणुचा प्रादुर्भाव अन्य देशांमध्येही पसरलेला आहे. या आजारावर अद्याप तरी औषध उपलब्ध नसल्यामुळे रूग्णाची लक्षणे पाहून उपचार दिले जात आहे. मात्र, दुसरीकडे सोशल मिडियावर या आजारापासून बचावासाठी तुम्ही काय खाल्ले पाहिजे, हा पदार्थ खाल्लयावर आजार बरा होतो असे दावे केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सभ्रामवस्था निर्माण होत आहे.

भारतात सोशल मिडियाचा जेवढा फायदा आहे, त्यापेक्षा अधिक तोटा अधिक होतो. विशेषत: चुकीच्या माहितीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरते. स्वाईन फ्लू, डेंग्युच्या काळात किवीचे फळ खावे, पपई खावी, पपईचा रस प्यावा यासह एक ना अनेक फळ, पदार्थांची नावे जोडून ते खाल्लयाने आजार बरा होतो असे सांगण्यात येते. त्यामध्ये किती तथ्य आहे, याबाबत कोणीच खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकही भितीपोटी हे प्रयोग करताना दिसतात. अशा परिस्थितीत काहींना फरक जाणवलाही असेल, परंतू बहुतांश नागरिकांना त्याचा त्रास झाला. ऍलर्जी झाल्याचे दिसून आले.

सध्या, चीनसह अन्य 14 देशात नवीन करोना विषाणूचे रूग्ण आढळून आले आहे. भारतातील केरळमध्येही एक रूग्ण आढळून आला आहे. मात्र, या आजारावर अद्याप कोणतीही लस किंवा औषधोपचार उपलब्ध नसल्यामुळे आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे रूग्ण दगावत आहे. अशा परिस्थितीत “सोशल मिडियावर ऍक्‍टीव्ह असलेल्या’ व्यक्तींकडून पुन्हा काय खाल्लयावर आजाराला रोखू शकतो याबाबत माहिती दिली जात आहे.

लसणाचा रस पिल्यावर हा आजार होवू शकत नाही, अशी माहिती सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. याबाबत तज्ज्ञ डॉक्‍टरांशी चर्चा केली असता, अशाप्रकारची माहिती सोशल मिडियावर टाकणे चुकीचे आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरविण्यापेक्षा, काय काळजी घेतली पाहिजे याबाबत जागृती करणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.