सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ‘जेसीबी की खुदाई’; अनेक मीम्स व्हायरल 

नवी दिल्ली – सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओज,  हॅशटॅग ट्रेंड होत असतात. तसेच ते तात्काळ व्हायरलही होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका  हॅशटॅग  ट्रेंड होत असून तो  पाहून तुम्हालाही हसू येईल. हा हॅशटॅग आहे ‘जेसीबी की खुदाई’ (#JCBKiKhudai).

जेसीबी मशीन ही जमीन खोदण्यासाठी वापरतात मात्र, आता सध्या हिच जेसीबी मशीन सोशल मीडियात ट्रेंड होत आहे आणि त्याचं कारण म्हणजे त्यावर तयार करण्यात आलेले मीम्स. एका ट्विटर युझरने जेसीबी खड्डा खोदत असताना आजुबाजुला किती लोकं उभे राहतात याचा एक व्हिडिओ शेअर केला. त्याने जेसीबीचा स्क्रीनशॉट शेअर करताना ट्विट करत लिहिलं की, ‘जेसीबी खड्डा खोदतानाचे जोक्स खूपच मजेदार आहेत. जेसीबी खड्डा खोदत असल्याचे युट्यूबवरील व्हिडिओ पाहण्यासाठी अनेक बेरोजगार आहेत.’ या व्हिडिओजला लाखों हिट्स सुद्धा मिळत आहेत. इतकंच नाही तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी हिने सुद्धा आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सनी लिओनी जेसीबी मशिनवर उभी असल्याचं पहायला मिळत आहे.

https://twitter.com/itshimanshu4u/status/1133053761188970496

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.