Travel Tip | कोणत्याही प्रवासाला निघायचं असेल तर पोट बिघडून चालणार नसते. परंतु तरीही काही आवडीचे चमचमीत खाणे समोर आले तर मोह आवरणे कठीण जाते. परंतु त्यामुळे तुमचे प्रवासाचे गणितही बिघडू शकते. त्यातूनही तुम्ही जर का विमान प्रवास करत असाल तर तो सुरू करण्यापूर्वी काय खायला हवं काय नको याचा विचार करणे आवश्यक ठरते.
१) संपूर्ण विमान प्रवासात मस्त ताणून द्यावी असा विचार करत असाल तर विमान प्रवासापूर्वी चहा कॉफी पिऊ नका.
२) विमानात अनेकदा चिप्स, खारे-मसाले शेंगदाणे यासारखे पदार्थ दिले जातात. हे पदार्थ खायला चटपटीत असले तरी ते जास्त प्रमाणात खाल्ले तर तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते. विमान प्रवासात तुमच्या तळपायात वेदना जाणवत असतील तर हे पदार्थ न खाल्लेले बरे.
३) तळलेल्या पदार्थांमध्ये फॅट्स जास्त असतात आणि ते पचण्यास जास्त वेळ लागतो. विमान प्रवासातील जास्त वेळ टॉयलेटमध्ये जाऊ नये असे वाटत असेल तर तळलेले पदार्थ खाणे टाळा.
४) मुख्य म्हणजे विमान प्रवास लांब अंतराचा असेल तर आवडीचं काहीतरी खाऊन घ्या. कारण विमानात तुमच्यासमोर नेमकं कोणतं खाणं सर्व केले जाईल हे सांगता येत नसते.
५) सतत चहा कॉफी पिण्याची अनेकांना सवय असते. पण जास्त चहा-कॉफी पिल्याने डीहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. तसेच चहा-कॉफीमुळे पित्ताचाही त्रास होऊ शकतो.
६) राजमा, ब्रोकोली हे पदार्थ पौष्टिक असले, तरीसुद्धा ते खाल्ल्यामुळे पोटात गॅस होऊ शकतो. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे शक्यतो प्रवासात हे पदार्थ खाणे टाळावे. त्याचबरोबर मसालेदार खाणं कितीही आवडीचे असेल तरीसुद्धा प्रवासात मसालेदार खाणे टाळावे. कारण त्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता जास्त असते. लांबच्या प्रवासा आधी निघण्याआधी तिखट खाऊ नये.
७) चहा-कॉफी प्रमाणेच एनर्जी ड्रिंक मध्येही कॅफेनचे प्रमाण मुबलक असते. तसेच त्यामुळे पोटात गॅस तयार होऊ शकतो. त्यामुळे अशी पेये टाळावीत.
८) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मद्यपान हे केव्हाही आरोग्यासाठी हानिकारक असते. प्रवासात तर मद्यपान कधीही करू नये. कारण त्यामुळे हंगोवर आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.