ट्रान्सपोर्टचे गोदाम फोडले; 15 लाखांचा मुद्देमाल चोरी 

नगर – नगर एमआयडीसी येथील सेफ एक्‍सप्रेस प्रायव्हेट लिमेटेड ट्रान्सपोर्टचे गोदाम अज्ञात चोरट्यांनी फोडले असून, 15 लाख 81 हजार 10 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत राकेशकुमार पांडे (वय-34. रा. मूळ बबनपुरा, अभईपुरा, ता. जमानिया, जि. गाजेपुरा, रा. उत्तर प्रदेश, हल्ली रा. पूजा कार एसी जवळ, कॉटेज कॉर्नर सावेडी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, सेफ एक्‍सप्रेस प्रायव्हेट लिमेटेड ट्रान्सपोर्टच्या गोदामाच्या शटरचा पत्रा उचकटून त्यामधून 89 हजार 674 रुपये किमतीचे चार एसी, 90 हजार रुपयांचे एल ऍण्ड टी कंपनीचे इलक्‍ट्रिक पार्ट, 4 लाख 25 हजार 280 रुपयांचे 28 बेअरिंग बॉक्‍स यांसह 15 लाख 81 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक एन. एस. सहारे पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.