हडपसर मतदारसंघात परिवर्तनाचा पदाधिकाऱ्यांना विश्‍वास

“महाआघाडी’चे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ सर्वजण एकवटले ः सर्वत्र झंझावात

हडपसर – राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. त्यांच्यासमवेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले आहेत. त्यामुळे यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होऊन चेतन तुपे आमदार होणार, असा ठाम विश्‍वास महाआघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी महापौर प्रशांत जगताप इच्छुक होते. परंतु चेतन तुपे यांना उमेदवारी मिळाली तेव्हा जगताप हे तुपे यांचे काम करणार का, याबाबत चर्चा होत्या. त्या चर्चांना दोघांच्या मनोमिलनाने पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, या प्रचार फेरीवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक प्रशांत जगताप, माजी उपमहापौर निलेश मगर, नगरसेवक आनंद आलकुंटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गेली वीस वर्षांत पुणे शहर, पालिका आणि हडपसर भागात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून विकास कामे झाली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून दिले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍या, उड्डाणपूल, वानवडी व हडपसर येथील नाट्यगृह ही कामे केली असून मेट्रोचे कामही केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठपुराव्यातून होत आहे. त्यामुळे यापुढेही हडपसर मतदारसंघाचा सुनियोजित विकास साधण्यासाठी चेतन तुपे यांनाच प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी महापौर नगसेवक प्रशांत जगताप यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)