अवसरी खुर्दचा वळसे पाटील यांच्याकडून कायापालट

संतोष भोर : गावभेट दौऱ्यात मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी

अवसरी – अवसरी खुर्द गाव विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दत्तक घेवुन गावाचा कायापालट केला आहे. वळसे पाटील यांच्या पाठीशी अवसरी खुर्द ग्रामस्थ नेहमीच ठामपणे उभे असल्याचे प्रत्येक निवडणुकीत दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना सर्वाधिक मताधिक्‍य देण्याचा मतदारांनी निश्‍चय केल्याची माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सदस्य आणि माजी सरपंच संतोष भोर यांनी दिली.

अवसरी खुर्द येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारानिमित गावभेट दौरा व मतदारांच्या गाठीभेटी निमित्त कार्यकर्त्यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस शरद शिंदे, शरद बॅंकेचे संचालक विजय टेमकर, सरपंच संगीता शिंदे, अवसरी खुर्द पंचायत समिती गण प्रमुख दिनेश खेडकर, माजी उपसरपंच निलेश टेमकर, अल्पसंख्याक सेलचे बाबू मणियार, सचिन ढोणे, अंकुश लोंढे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विकासाचा वेग अधिक ठेवण्यासाठी वळसे पाटील यांच्या पाठिशी खंबीरपणे मतदारांनी उभे राहावे व त्यांना मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती आनंद शिंदे आणि भीमाशंकर कारखान्याचे संचालक दगडू शिंदे यांनी केले.

दिलीप वळसे पाटील यांना सहा विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मताधिक्‍याची देण्याची अवसरी खुर्द गावची परंपरा कायम राखण्याचा निर्धार केला आहे.
– शरद शिंदे, सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पुणे जिल्हा

Leave A Reply

Your email address will not be published.