तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनातील 3 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची समग्र शिक्षा अभियान प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

मुंबई पालिकेतील रिक्त झालेल्या डॉ. अश्विनी जोशी यांच्या जागी महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एम. काकाणी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे सहनिवासी आयुक्त सुमन चंद्रा यांची बुलढाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.