जिल्हाअंतर्गत पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

सातारा– जिल्हा पोलीस दलातील चार पोलिस निरीक्षकांच्या गुरूवारी जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या असून,जिल्ह्यात चार नवे सहायक पोलिस निरीक्षक हजर झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस निरीक्षकांच्या बदल्यामध्ये सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांची सायबर पोलीस ठाण्यात, शिरवळचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांची आर्थिक गुन्हे शाखेत, सायबरचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांची शिरवळ पोलीस ठाण्यात, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांची सातारा तालुका पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

तर सातारा शहरचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चौगुले, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांची कºहाड  शहरला बदली झाली. तर कºहाड शहरचे शिवराम खाडे शाहूपुरी पोलीस ठाणे, शिरवळच्या महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांची सातारा तालुका, खंडाळ्याचे उपनिरीक्षक महेश कदम यांची सातारा शहर, सातारा शहरचे भानुदास पवार यांची उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या कार्यालयात वाचक म्हणून बदली झाली आहे.

शिरवळचे मोहन तलवार यांची कोरेगावला बदली झाली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस दलात नव्याने हजर झालेल्या सहायक  पोलीस निरीक्षकामध्ये धोंडीराम वाळवेकर ( सातारा शहर पोलीस ठाणे), विजय गोडसे ( कºहाड शहर), सागर वाघ ( स्थानिक गुन्हे शाखा सातारा) या अधिकाºयांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.