मुंबई – राज्यात करोनापाठोपाठ अतिवृष्टी, पूरस्थिती अशा संकटकाळात स्थानिक पातळीवर कार्यक्षम प्रशासकीय अधिकाऱ्यांची नितांत गरज असते. याच राज्य सरकारकडून सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने शुक्रवारी तब्बल 14 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
या बदल्यांमध्ये पुणे महसूल विभागाचे उपायुक्त प्रताप जाधव यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदावर करण्यात आली आहे. तर अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
कुमार खैरे यांची नियुक्ती सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर करण्यात आली आहे. याशिवाय जी. एम. बोडके, एस. जी. देशमुख, एम देवेंद्र सिंह, राहुल कर्डिले, जी. एस. पापळकर, रुचेश जयवंशी, एन. आर. गटणे आणि दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या अन्य जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.