मुख्याधिकारी आवारे यांची बदली

तळेगाव दाभाडेचा अतिरिक्‍त कार्यभार लोणावळ्याच्या मुख्याधिकाऱ्यांकडे
तळेगाव दाभाडे – नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव विनायक आवारे यांची अकोला महानगरपालिकेच्या साहाय्यक आयुक्‍तपदी बदली झाली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा अतिरिक्‍त कार्यभार लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांना सोपविला.

जून 2016 मध्ये मुख्याधिकारी आवारे यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ, सुंदर, हिरवे, तळेगाव शहर करण्यासाठी वृक्षारोपण, संवर्धन व संरक्षण संकल्पना राबविली. त्याच बरोबर शहरातील अतिक्रमण कारवाई, भुयारी गटारे, पाणीपुरवठा योजना, तळ्याचे पुनर्जीवन, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी रेल्वे भुयारी मार्ग, शिवशंभू स्मारक, क्रीडांगण जागा संपादन, नगरपरिषदेसाठी प्रशासकीय इमारत, व्यापारी संकुल व विकास आराखड्यातील रस्ते आदी कामे केली. मुख्याधिकारी आवारे यांचा कार्यकाळ वाढवून त्यांना पुन्हा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्‍ती देण्याबाबत राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांना पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी साकडे घातले आहे.

याप्रसंगी मुख्याधिकारी वैभव आवारे म्हणाले शहरात दिवसेंदिवस नागरीकरणात वाढ होत असून पुणे-मुंबई शहरातील सेवानिवृत्त ज्येष्ठांची पसंती अधिक आहे. आनंदात काम केल्यावर कामाचा थकवा येत नाही. हेच मी येथे शिकलो. आवारे यांना राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, गटनेता सुशील सैंदाणे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, अरुण भेगडे, संदीप शेळके, कल्पना भोपळे, विभावरी दाभाडे, संतोष शिंदे, अमोल शेटे, प्राची हेंद्रे, यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)