पुणे विभागातील 25 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे -आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पुणे विभागातील 25 उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

यामध्ये नोंदणी उपमहानिरीक्षक सोनप्पा यमगर यांची बदली पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी, तर पुण्याच्या उपजिल्हा निवडणुक अधिकारी मोनिका ठाकूर यांची साताऱ्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारीपदी, पुणे शहरचे प्रांताधिकारी भाऊ गलांडे यांची कोल्हापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर पुण्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारीपदी मृणालिनी सावंत, यांची तर पुणे शहर प्रांताधिकारीपदी संतोषकुमार देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे विभागात एकाच पदावर तीन वर्षे पूर्ण झालेल्या उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना तत्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्या अधिकाऱ्यांकडे विधानसभा निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती आहे, त्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी निवडणुकीचे प्रशिक्षण पूर्ण केले नसल्यास दि.9 ते दि.11 या दरम्यान, यशदा येथे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्‍यक असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

उपजिल्हाधिकारी आणि कंसात नवीन नियुक्‍ती
हेमंत निकम (उपविभागीय अधिकारी सोलापूर), दादासाहेब कांबळे (उपविभागीय अधिकारी बारामती), संजय शिंदे (विशेष भूसंपादन अधिकारी पुणे), सचिन इथापे (उपजिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे), हिम्मत खराडे (नोंदणी महानिरीक्षक कार्यालय), अश्‍विनी जिरंगे (उपजिल्हाधिकारी, नागरी समूह पुणे), दत्तात्रय कवितके (रोजगार हमी योजना सांगली)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.