रेल्वे मार्गावर दरड कोसळली, ट्रॅक मातीखाली

मंकीहिलजवळ घटना : सेवा विस्कळीत
लोणावळ्यात 24 तासांत 375 मिमी 

लोणावळा – मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या खंडाळा घाटात ठाकूरवाडी मंकीहील सेक्‍शनमध्ये मंकीहिल येथे किलोमीटर क्रमांक 115/8-10 जवळ एक मोठी दरड रेल्वेच्या ट्रॅकवर आली. मध्यरात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान ही घटना घडली. या दरडीमुळे रेल्वेची डाऊन आणि मिडल लाईन पूर्णतः मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याने वाहतुकीस बंद झाली होती.

मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. ही दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लोणावळा शहरात मुसळधार पाऊस पडत असून, शुक्रवारी सकाळी आठ ते शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासांत 375 मिलिमीटर म्हणजे सुमारे 15 इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

यातील 300 मिलिमीटर पाऊस हा केवळ नंतरच्या 15 तासांमध्ये कोसळला. पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा जोर वाढल्याने पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास बंदी करण्यात आली आहे. सोबतच भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या पर्यटन स्थळाकडे जाणारा मार्गदेखील बंद करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)