पुणे – राज्यातील आदिवासी उमेदवारांसाठी वर्ग-तीन व वर्ग चार पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र येथे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण येत्या १ डिसेंबर २०२४ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन रक्कम मिळणार आहे. या प्रशिक्षणासाठी अनुसूचित जमातीच्या पात्र आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी जिल्हा रोजगार केंद्रात नोंदणी असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र येथे २६ नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत, तसेच मूळ कागदपत्रांसह २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंदास्थळी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
निवड यादी दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवार अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे किमान वय १८ ते ३८ दरम्यान असावे. उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र, गुणपत्रिका, आधार कार्ड, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद या कार्यालयाचे नोंदणी कार्ड इत्यादी कागदपत्रे उमेदवारांकडे असावीत, असेही स्पष्ट केले आहे.