पुणे – रेल्वे प्रशासनाने पुणे-लोणावळा या मार्गावरील रेल्वेसेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वर्गातील नागरिकांनाच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. रेल्वेने गुरुवारी (दि.8) पुणे- लोणावळा लोकल रेल्वेचे वेळापत्रक जाहीर केले.
राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने विविध मार्गांवरील रेल्वेसेवा पुन्हा कार्यान्वित करण्यास सुरुवात केली. दरम्यान, प्रवाशांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले.
रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 12 ऑक्टोबरपासून पुणे -लोणावळा आणि लोणवाळा-पुणे ही लोकल सेवा मर्यादित स्वरुपात कार्यान्वित होणार आहे. गाडी क्र. 01482 ही पुण्याहून सकाळी 8.05 वाजता रवाना होऊन 9:30 वाजता लोणावळ्यात पोहोचेल.
तर गाडी क्रमांक 01483 ही लोणावळ्याहून सकाळी 8:20 वाजता रवाना होऊन 9:45 वाजता पुण्यात पोहोचेल. तर पुण्याहून सायंकाळी 6 वाजता दुसरी लोकल लोणावळ्याला रवाना होईल. ती सायंकाळी 7:27 वाजता पोहोचेन. तर लोणावळ्याहून सायंकाळी 5:30 वाजता रवाना होणारी रेल्वे सायंकाळी 7 वाजता पुण्यात पोहोचेल.