पुणे ते मुंबई मार्गावरील 6 रेल्वे गाड्या रद्द
पुणे – पुणे ते मुंबई मार्गावरील मंकी हिल ते कर्जत अप लाईनवरील दक्षिण पूर्व घाट परिसरात पायाभूत सुविधांचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी पुणे-मुंबई मार्गावरील 6 गाड्या रद्द राहणार आहेत. तर, अनेक गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
अनेक रेल्वेगाड्या 31 डिसेंबरपर्यंत रद्द राहणार आहेत. तर, काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. दि. 1 ते 31 डिसेंबरदरम्यान मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, हुबळी एक्स्प्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस, नांदेड-पनवेल एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद हुसेनसागर एक्स्प्रेस या सर्व गाड्या पुणे स्थानकातून सुटणार आहेत. तर, परतीच्या प्रवासातदेखील या गाड्या पुण्यापर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या गाड्या रद्द
मुंबई-पंढरपूर पॅसेंजर
मुंबई-विजापूर पॅसेंजर
पनवेल-पुणे पॅसेंजर
दौंड कॉर्डलाइन मार्गे
पुणे-भुसावळ एक्स्प्रेस