अक्षयच्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

मुंबई – बॉलीूवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता अक्षय कुमार. अक्षय कुमारने या वर्षी सलग एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहेत. आता या वर्षीच्या अखेरीसही ‘गुड न्यूज’ हा चित्रपट तो घेऊन आला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करिना कपूर खान, किआरा आडवाणी, दलजीत दोसांझ अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर अक्षय आणि करिनाची जोडी पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट चर्चेत होता. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरविषयी चाहत्यांना उत्सुकता होती. गरोदरपणाच्या गोंधळामध्ये अक्षय, करिना, किआरा, आणि दिलजीत यांची कशी धमाल उडते, याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.