रहस्यमय-थरारपट ‘डिबक-द कर्स इज रियल’चा ट्रेलर रिलीज

मुंबई – बॉलीवूड अभिनेता इम्रान हाश्‍मीचा बहुप्रतीक्षित रहस्यमय-थरारपट “डिबक – द कर्स इज रियल’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जय के. यांनी केले असून, तो सुपरहिट मल्याळम “एझ्रा’चा हिंदी रिमेक आहे. 

या चित्रपटातून इम्रान हाश्‍मी वेगळ्या भूमिकेत दिसणार असून, सोबत निकिता दत्ता आणि मानव कौल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मॉरिशसच्या निसर्गरम्य पार्श्‍वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटात शापित बेटावर घडणारे भयंकर प्रसंग पाहायला मिळणार आहेत. 

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका जोडप्यातील पत्नी प्राचीन ज्युईश बॉक्‍स समजून डिबक बॉक्‍स घरी घेऊन आल्यानंतर उद्‌भवणारे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. चित्रपटाबाबत इम्रान हाश्‍मी म्हणाला, “डिबक’ हा माझा पहिला डिजिटल चित्रपट आहे आणि माझ्या आवडत्या प्रकारच्या भूमिकेसह स्ट्रीमिंग पार्टनर म्हणून अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 

या प्रवासाची सुरुवात करत असल्याचा आनंद आहे. हा चित्रपट अतिशय विचारपूर्वक, काही घाबरवणारे प्रसंग समाविष्ट करत उत्तम कथानकासह तयार करण्यात आला आहे. हॅलोवीनमुळे घाबरवण्याचा जोशवरच्या पातळीवर असून, त्यातच आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. प्रेक्षकांनी डिबकचा आनंद घ्यावा, असे इम्रान हाश्‍मी म्हणाला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.