इमरान हाश्मी आणि ऋषि कपूर यांचा आगामी “द बॉडी’ हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट “दृष्यम’चे निर्माता जीतू जोसेफ यांनी डायरेक्ट केला आहे. यात ऋषि कपूर आणि सोभिता धुलिपाला मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 2012मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे.
या चित्रपटाच्या क्लिपसोबत इमरान हाश्मीने ट्वीट केले की, “मृत्यू हा प्रत्येक गोष्टीचा अंत असू शकत नाही.’ तसेच या ट्रेलरमध्ये ऋषि कपूर एका प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या माया यांच्या मृत्यूबाबत तपास करताना दिसत आहे. मायाची बॉडी मिसिंग असून इमरान हाश्मीवर खून केल्याचा संशय दाखविण्यात आला आहे.
तसेच ऋषि कपूर मृत्यूचे रहस्य शोधत असताना स्ट्रगल करत असताना दिसतात. परंतु ट्रेलर पाहता माया यांचा मृत्यू झाला की नाही याबाबत साशंकता वाटते. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्येही खूप उत्सुकता निर्माण झाली असून अनेकांनी ट्रेलर पाहिल्यानंतर लाखोंच्या संख्येने लाईक्स् दिल्या आहेत.