हॉलीवूड अभिनेता जॅक स्नायडरच्या आगामी “आर्मी ऑफ द डेड’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीचीही झलक दाखविण्यात आलेली आहे.
हुमा कुरेशी ही भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. हा तिचा पहिला हॉलीवूड चित्रपट आहे. या चित्रपटात हुमा कुरेशी ही गीताची भूमिका साकारत आहे. परंतु तिच्या पात्राबाबत अद्याप विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही.
“आर्मी ऑफ द डेड’ हा 2004मध्ये प्रदर्शित झालेल्या “डॉन ऑफ द डेड’चा सीक्वल आहे. या चित्रपटातदेखील जॅक स्नायडरने मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर हॉलीवूडमध्ये अनेक जॉम्बी-थ्रिलर चित्रपट साकारण्यात आले आहेत.