“बीए पास 3’चे ट्रेलर रिलीज

निर्माता-दिग्दर्शक नरेंद्र सिंह हे सध्या “बीए पास’ या आपल्या फ्रॅंचाईजीमध्ये सध्या खूप बिझी आहेत. त्यांनी या फ्रॅंचाईजीचा पुढचा सिनेमा 1 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

बॉक्‍स ऍपवर हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि सिनेमाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. “बीए पास 3′ ची कथा अनैतिक संबंधांच्या आजूबाजूला फिरणारी आहे. ट्रेलरमध्येच यातील रोमॅंटिक कथेची झलक बघायला मिळते. 

सर्वसाधारणपणे अनैतिक संबंधांची कथा असलेल्या सिनेमांच्या क्‍लायमॅक्‍समध्ये बघायला मिळणारा ऍक्‍शनचा तडका “बीए पास 3’च्या ट्रेलरमध्ये बघायला मिळत नाही. थोडी संथ आणि शांत अशी ही कथा असल्याचा आभास निर्माण होतो आहे. 

सनी सचदेवा, अंकिता चौहान, अरमान संधू आणि अंकिता साहू हे यातील मुख्य कलाकार असणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी थोड्या हटके विषयावरील हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येतो आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.