सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे केला तपास
येरवडा (प्रतिनिधी)-दुचाकीस्वाराला धडक देवुन त्याच्या मृत्युस कारणीभुत फरार झालेल्या ट्रेलर चालकास सीसीटिव्हीच्या आधारे विश्रांतवाडी पोलीसांनी अटक केली आहे.ट्रेलर चालक रामचंद्र तुकाराम खांडेकर (रा.मंगळवेढा,सोलापुर)याला अटक केली आहे.
विश्रांतवाडी पोलीसांनी दिलेल्या माहिनुसार,विश्रांतवाडी रस्त्यावर हेंद्रे भेळ दुकानासमोर रात्रीच्यावेळी एका दुचाकीस्वारास एका भरधाव ट्रेलरने धडक दिली होती.यात या दुचाकी चालकाचा मृत्यु झाला.विश्रांतवाडी पोलीस घटनास्थळी असणाऱ्या सीसीटिव्हीचा तपास करताना त्यांना दोन भरधाव ट्रेलर या फुटेजमध्ये दिसले होते.मात्र यात ट्रेलरचा नंबर स्प्ष्ट दिसत नव्हता.ते ट्रेलर ज्या मार्गावरुन गेले त्या मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता खराडी बायपास चौकातुन ते ट्रेलर हडपसर मुंढवा रस्त्याकडे वळण घेताना त्या ट्रेलरवर “श्री बिरोबा रोडलाइन पुणे असे लिहिलेले दिसले त्यानुसार पोलीस कर्मचारी प्रविण भालचिम आणि प्रफ्फुल मोरे यांनी या ट्रान्सपोर्ट कंपनीचा शोध घेत असताना त्यांना भोसरी मार्गे एक ट्रेलर येताना दिसला त्या ट्रेलरवर ट्रान्सपोर्ट कंपनीचे नाव दिसुन आले.त्याच्या चालकाकडे चौकशी केली असता ही कंपनीचे कार्यालय जाधववाडी, मोशी येथे आहे.
कंपनीची वाहने आळंदी रस्त्यावरुन जातात असे सांगितले.कंपनीच्या मालकाकडे चौकशी करुन अपघाताच्या दिवशी कोणत्या क्रमांकाची वाहने या रस्त्यावरुन गेली याची माहिती घेतली असता एम एच 14 जे यु 5599 या नंबरच्या ट्रेलर चालक रामचंद्र खांडेकर यांने नेले होते.त्याच्याकडे चौकशी केली असता अपघात करून पळून गेल्याचे त्याने कबूल केले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड,गुन्हे निरीक्षक रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी लहु सातपुते,कर्मचारी प्रविण भालचिम,यशवंत किर्वे,अझरुद्दीन पठाण,किशोर दुशिंग,नितीन साबळे,प्रफ्फुल मोरे,शेखर खराडे,संदीप देवकाते यांच्या पथकाने ही कामगिरी बजाविली.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव करीत आहे