नागपूर – रस्ते अपघातात 7 जण दगावल्याची नगर जिल्ह्यातील अपघाताची घटना ताजी असताना आज नागपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघात सुद्धा 7 जणांनी आपला प्राण गमावला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड मार्गावरील उमरगाव फाट्या जवळ तवेरा कारने ट्रकला ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये महिलेचा व चिमुकलीचा समावेश आहे.
या अपघाता संदर्भात सविस्तर माहिती अशी की, नागपूर शहराच्या दिशेने रात्री 11 वाजेच्या सुमारास तवेरा कार 10 प्रवाशांना घेऊन जात होती. दरम्यान या भरधाव कारने ट्रकला ओव्हरटेक करत असताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला व कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये कारमधील सात जणांचा जागीत मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच पुरुष, एक महिला व एका चिमुकलीचा समावेश होता.
सागर शेंडे रा. पिवळी नदीजवळ, उप्पलवाडी (टवेराचालक), मेघा आशिष भुजाडे रा. नझूल ले-आउट बेझनबाग, देविदास गेडाम, नरेश डोंगरे रा. भीमचौक, इंदोरा अशी मृतांची नावं आहे. अन्य् तीन मृतांचे अद्याप समजू शकले नाहीत. या अपघाताची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरु केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.