IPS officer Harshwardhan | कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील पहिल्या पोस्टींगवर हजर राहण्यासाठी जात असणाऱ्या तरुण आयपीएस अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. हर्षवर्धन हे त्यांचे नाव असून आपल्या कर्तव्यावर हजर राहण्यासाठी जाताना त्यांच्या कारला अपघात झाला.
26 वर्षीय हर्षवर्धन यांनी नुकतेच त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. हर्षवर्धन हे मूळचे मध्य प्रदेशचे होते आणि कर्नाटक केडरचे 2023 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. हर्षवर्धन यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास केली होती. त्यांना 153 वी रँक मिळाली होती.
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरावर आणि झाडावर आदळले. हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चालक किरकोळ जखमी झाला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आणि सांगितले की, ‘जेव्हा अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळत होते, तेव्हा असे घडायला नको होते. ते आयपीएस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार असतानाच असा अपघात घडला हे अतिशय खेदजनक आहे. वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीला फळ येत असताना असे घडले नसावे.’ तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी ही याप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे.
हेही वाचा:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्बेतीविषयी मोठी अपडेट समोर ; शिंदेनी आजच्या सर्व बैठका केल्या रद्द