नवी दिल्ली – सियाचिन, डोकलाम आणि लडाख या उंचावरील युद्धक्षेत्रात, बर्फाळ भागात तैनात असलेल्या जवानांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातच मिळालेल्या माहितीनुसार, सियाचिनमध्ये उणे 26 अंश सेल्सिअस वातावरणात तैनात असलेले एक भारतीय जवानाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,’उत्तऱाखंड येथे राहणारे जवान रमेश बहुगुणा सियाचिन सेक्टर येथे तैनात होते. अचानक त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना चंडीगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. भयंकर थंडी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांची तब्येत बिघडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 38 वर्षांचे जवान रमेश बहुगुणा यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलं आहेत. बहुगुणा 2002 साली लष्करात रुजू झाले होते.’
तत्पूर्वी, पुरेसे कपडे, बूट, स्लिपींग बॅगचा तुडवडा तर जवानांना उष्ण कॅलरी युक्त पोषक आहार सुद्धा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने सैनिकांच्या कॅलरी ग्रहणात ८२ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे कॅगने स्पष्ट केले आहे.