बेंगळुरू – कोणत्याही प्रकारचा आगळा विक्रम करणे अनेकांना आवडत असले तरी कोणतीही कल्पना नसतानाही विक्रम करणारे काही जण असतात कर्नाटकची राजधानी बेंगलोर मधील एल राजेश कुमार त्यापैकीच एक म्हणावा लागेल कारण वाहतुकीचे नियम मोडण्याचा एक आगळावेगळा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे.
गेल्या अकरा महिन्यांच्या कालावधीमध्ये त्याने तब्बल एकशे एक वेळा वाहतुकीच्या नियमांचा भंग केला आहे आणि म्हणून त्याच्यावर कारवाई करताना बेंगलोरच्या वाहतूक विभागाने त्याला तब्बल साडेपाच फूट लांब कारवाईची नोटीस म्हणजेच चालान बजावली आहे
राजेश कुमार एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो आपल्या घरापासून ऑफिस पर्यंत जाण्यासाठी तो दुचाकीचा वापर करतो दोन दिवसापूर्वी पुन्हा एकदा त्याला वाहतुकीच्या नियमांचा भंग करताना पोलिसांनी पकडले आणि तेव्हा त्याचा इतिहास पाहण्यात आला तेव्हा अशा प्रकारचे गुन्हे करणारा तो मास्टर असल्याचे समोर आले
गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये दुचाकी खरेदी केलेल्या राजेश कुमार वर गेल्या वर्षीच्या सप्टेंबर पासून आतापर्यंत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वाहतूक खात्याने त्याला आतापर्यंत कारवाईच्या ज्या नोटिसा किंवा चालान पाठवले त्याला त्याने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही
शेवटी दंड वसूल करण्यासाठी राजेशची बुलेट मोटरसायकल जप्त करण्यात आली आणि त्याला तब्बल साडेपाच फूट लांबीची नोटीस बजावण्यात आली शिवाय आत्तापर्यंत केलेल्या सर्व गुन्ह्यांसाठी त्याला सत्तावन्न हजार दोनशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला हा दंड राजेश जेव्हा सरकारी तिजोरीत जमा करेल तेव्हा त्याच्या नावावर एक विक्रम नोंदवला जाईल आतापर्यंत बेंगलोर शहरातील एका भाजीवालाच्या नावावर हा विक्रम होता त्याने एकाच वेळी 15 हजार 400 रुपयांचा दंड वाहतुकीचे नियम तोडल्याने भरला होत त्याच्या नावावर वाहतुकीचे पंचावन्न गुन्हे होते त्याला वाहतूक विभागाने जेव्हा कारवाईची नोटीस पाठवली होती ती पाच फूट एक इंच लांब होती राजेशने मात्र आपल्या कारवाईने या भाजीवाल्याचा विक्रम मोडला आहे
राजेश कुमारने केलेले वाहतूक गुन्हे
- हेल्मेट शिवाय प्रवास 41
- वाहतूक सिग्नल तोडणे 5
- दुचाकीवर मागे बसलेल्याने हेल्मेट न वापरणे 28
- रॉंग पार्किंग 3
- दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे 10
- महामार्गावर लेनची शिस्त न पाळणे 5
- नो एंट्रीमध्ये घुसणे 6
- इतर गुन्हे तीन