पिंपरी – एलपीजी गॅस सिलिंडरची धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाने आणि त्याच्या सहकाऱ्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न केला, तसेच रस्त्यात थांबून धक्काबुक्की केली.
वाहतूक पोलीस कर्मचारी टेम्पोचा पाठलाग करत होता आणि टेम्पोतील आरोपी कधी पोलीस कर्मचाऱ्यासोबत धक्काबुक्की तर कधी दुचाकीला धक्का देऊन पाडत होते. हा प्रकार मंगळवारी (दि.30) दुपारी एकच्या सुमारास डायमंड चौक चिखली आणि कुदळवाडी ब्रीज येथे घडला.