वाहतूक पोलीस, वॉर्डनला बेदम मारहाण

चार जणांना अटक : गाडी घासरल्याच्या कारणावरुन भांडण, हिंजवडी येथील प्रकार

पिंपरी  – गाडी घासल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात वाहतूक पोलीस शाखेच्या कर्मचाऱ्यांसह वार्डनला दगडाने व लाकडी बांबूने मारहाण करण्यात आली. ही घटना 26 मे रोजी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास हिंजवडी येथील कस्तुरी रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर घडली.

गणेश पाटील, अमोल बनसोडे हे वाहतूक पोलीस कर्मचारी आणि ज्ञानेश्‍वर दांडगे हे वॉर्डन जखमी झाले आहेत. याप्रकरणी ट्रॅफिक वार्डन ज्ञानेश्‍वर दांडगे (वय- 24 रा. जांभुळकर जिम शेजारी, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सचिन दादा सांगळे (वय-24 रा. कासारसाई ता. मुळशी), अंबादास किसन काकडे (वय-32 रा. बुचडेनगर, शिंदेवस्ती), साईनाथ दामोदर किर्डीले (वय-28 रा. जगताप मळा), शंकर जाधव (रा. शिंदेवस्ती) यांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी घासल्याच्या कारणावरुन फिर्यादी यांच्या भावाला आरोपी मारहाण करुन 5 हजार रुपयांची मागणी करीत होते. फिंर्यादी यांच्या भावाने फिर्यादी दांडगे यांना याबाबत कळवले असता दांडगे आणि वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी अमोल बनसोडे, मनोज कांबळे, बन्सी रौदळ, संतोष मसळे, गणेश पाटील हे त्या ठिकाणी गेले. मारहाण करु नका, असे आरोपींना सांगितल्यामुळे आरोपी जास्त चिडले.

निसान गाडीचा चालक शंकर जाधव याने फिर्यादी ज्ञानेश्‍वर दांडगे यांच्या पाठीत दगडाने मारुन जखमी केले. तसेच वाहतूक पोलीस गणेश पाटील व अमोल बनसोडे यांनाही लाकडी बांबूने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यू.आर खाडे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)