वॉशिंग्टन – ध्वनी प्रदूषणाचा आणि हृदयविकाराचा थेट संबंध असल्याची माहिती अनेक वेळा समोर आली आहे आता नवीन संशोधनाप्रमाणे वाहतुकीतील गदारोळ आणि गोंधळ हृदयविकारासाठी धोकादायक असून वाहतुकीच्या गदारोळमध्ये जर पाच डेसीबलने वाढ झाली तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 35 टक्क्यांनी वाढते
युरोपियन हार्ट जर्नल यांनी केलेला संशोधनाप्रमाणे काही प्रमाणात वाढत जाणाऱ्या गोंधळामुळे हृदयावर परिणाम होतो वाहतुकीचा गोंधळ आणि विमानांचा आवाज याचा हृदयविकारावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी या संस्थेने त्या पाच वर्षांमध्ये एकूण पाचशे लोकांचा अभ्यास केला चोवीस तासांचा कालावधी मध्ये जर गोंधळाचे आणि आवाज यांचे प्रमाण पाच डेसीबलने वाढले तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही 35 टक्क्याने वाढते या संशोधनात सहभागी झालेल्या सर्व पाचशे लोकांचे ब्रेन स्कॅनिंग करण्यात आले होते .
गोंधळ किंवा आवाज जेव्हा वाढला तेव्हा मेंदूतील एका विशिष्ट भागावर परिणाम होतो हा भाग ताणतणाव बेचैनी आणि भीती या भावनांना नियंत्रित करत असते अशाप्रकारे बेचैनी भीती आणि तणाव वाढतो तेव्हा हृदयविकाराचा धोकाही वाढतो असे या संशोधनामध्ये मांडण्यात आले आहे जागतिक आरोग्य संघटनेनें दिलेल्या माहितीप्रमाणे ५५ डेसिबलपेक्षा जास्त गोंगाट धोकादायक असतो वाहतुकीचा गोंगाट किंवा विमानाचा आवाज याची डेसिबल पातळी ८० पेक्षा जास्त असते