#Video : पुणे-सातारा मार्गावर वाहतूक कोंडी

पुणे : सलग सुट्ट्या ‘एन्जॉय’ केल्यानंतर पुण्याकडे परतणाऱ्या वाहनांमुळे रविवारी दुपारी 4 पासून पुणे-सातारा महामार्गावर प्रंचड वाहतूक कोंडी झाली आहे. परिणामी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक गती कमी झाल्याने काही किमीचे अंतर कापण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत आहे.

सलग सुट्ट्या संपल्यामुळे आपापल्या मूळ गावी आणि पर्यटनासाठी गेलेले पर्यटक रविवारी सकाळपासून परतीच्या मार्गावर निघाले होते. पुणे-सातारा महामार्गावर दुपारपर्यंत नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होती. दुपारी चारनंतर पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढत गेली. जडवाहने, एसटी, व्होल्वो, खासगी प्रवासी गाड्या आणि चारचाकी वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.

दरम्यान, या महिन्यात 10 ऑगस्ट – महिन्यातील दुसरा शनिवार, 11 ऑगस्ट – रविवार, 12 ऑगस्ट – सोमवार बकरी ईद विकेंडला जोडून सुट्ट्या आल्या. तसेच लगेचच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 17 ऑगस्ट-पारशी नूतन वर्ष, 18 ऑगस्ट-रविवार अशा सुट्टयादेखील आल्या आहेत. त्यामुळे विकेंडला लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिकांनी गावाला तसेच पर्यटनासाठी जाण्यास मोठ्या प्रमाणात पंसती दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×