#video : काळेपडळ रेल्वे गेट बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी

काळेपडळ – काळेपडळ रेल्वे गेट क्र.८ बंद असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ऑक्टोबर दरम्यान रेल्वेच्या कामाकरिता हा गेट बंद आहे. काळेपडळ येथील रेल्वे क्रॉसिंग

करून हांडेवाडी रोड कडे जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार केला आहे. या रस्त्यावर सायंकाळी सात वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

पालिका आणि वाहतूक पोलिसांनी पर्यायी उपाययोजना करावी, अशी मागणी यश रवी पार्क सोसायटीचे अध्यक्ष वैभव माने यांनी केली. माने म्हणाले की, रेल्वे गेट बंद असल्यामुळे

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालकही चांगलेच त्रस्त झाले आहे. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.