हिंजवडी परिसरात वाहतूकीत बदल

नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

 

पुणे – मुंबई-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुकडील सर्व्हिस रस्त्याची रुंदी वाढवून 12 मीटर करण्यासाठी टेकडीचे खोदकाम सुरू आहे.

या ठिकाणी जुनापूल काढण्यात येवून तेथे दुसरा नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्याकरिता पुलापासून 350 मीटरचा रस्ता पुलावर जाण्यासाठी सुसगावच्या बाजूकडून तयार करणार आहे.

या कामामुळेच मुंबई-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील जुना पाषाण सूस उड्डानपूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे.

पर्यायी मार्गानुसार पाषाण ते सुसगाव व सुसगाव ते पाषाणकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हुंदाई शोरुम सुसरोड येथून सुपीरो ईलाईट सोसायटी मार्गे ननावरे सबवेमधून इच्छित स्थळी जाण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.