लोणावळ्यात वाहतूक कोंडी

पर्यटकांच्या गर्दीचा परिणाम : भुशी धरण मार्गावर वाहनांच्या रांगा

लोणावळा – मागील संपूर्ण आठवडा पावसाने ओढ दिल्याने शनिवारी लोणावळा शहरात पर्यटकांचा ओघ कमी राहिला. मात्र, त्या तुलनेत रविवारी अचानक पुन्हा एकदा पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने लोणावळा शहरात सर्वच रस्त्यांवर मोठी ट्रॅफिक जॅम झाले होते.

मागील दोन “विकेंड’ला लोणावळा शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यापार्श्वभूमीवर या “विकेंड’ला लक्‍झरी बस सारख्या मोठ्या वाहनांना लोणावळा शहरात भुशी धरणाच्या मार्गावर बंदी घालण्यात आली होती. त्यातच पावसाने ओढ दिल्याने सर्व धबधबे आणि भुशी धरणाच्या पायऱ्या कोरड्या पडल्या होत्या. त्यामुळे शनिवारी याआधीच्या शनिवारच्या तुलनेत पर्यटकांची गर्दी खूपच कमी राहिली होती. मात्र रविवारी पुन्हा एकदा पर्यटकांचा आणि वाहनांचा ओघ वाढल्याने भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. याचा परिणाम राष्ट्रीय महामार्ग तसेच शहरातील इतर अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीवर झाला होता.

लोणावळा शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे “गुगल मॅप’च्या आधारे नेव्हीगेशन सुरू करून इतर मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न प्रवासी करतात. मात्र हे सर्व सर्व रस्ते शहरातील तुंगार्ली, वलवन, नांगरगाव, भांगरवाडी, इंदिरानगर तसेच जुना खंडाळा या रहिवासी भागातून जात असल्याने या सर्वच मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे स्थानिक नागरिक ही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)