ऍपद्वारे भरता येणार वाहतूक दंड

महाराष्ट्र वाहतूक पोलिसांकडून मोबाइल ऍप विकसित

पुणे – महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडल्याचा दंड ऑनलाइन पाहण्यासाठी आणि तो भरण्यासाठी मोबाइल ऍप विकसित केले आहे. ऍपमुळे वाहनचालक आता कार्ड किंवा इंटरनेट बॅंकिंगद्वारे दंड भरू शकणार आहेत. याबाबत शहर वाहतूक शाखेने ट्‌विटरवर याबाबत माहिती दिली असता पुणेकरांनी “सोशल मीडिया’वर “ऍप’चे कौतुक केले.

वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड करण्यात येतो. वाहतूक विभागाकडून बहुतांश कारवाया सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात येतात. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांना त्यांच्या वाहनावर असणाऱ्या दंडाची माहितीच नसते. तसेच, दंड असल्याचे समजल्यास वाहनचालकांना दंड कसा भरायचा, असा प्रश्‍न पडतो. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी राज्य वाहतूक विभागाने थेट ऍपद्वारे दंड भरण्याची सुविधा दिली आहे.

असे जोडले जा ऍपशी…
वाहतूक विभागाकडून “मुंबई ट्रॅफीक’ आणि “महा ट्रॅफीक’ हे ऍप विकसित केले आहेत. हे ऍप “ऍन्ड्रॉईड’च्या “प्ले स्टोअर’ आणि “ऍपल’च्या “आयओएस ऍप स्टोअर’मधून डाऊनलोड करता येते. वापरकर्त्यांनी आपले वाहन ऍपशी जोडण्यासाठी “माय व्हेईकल’ या चिन्हावर “क्‍लिक’ करावे. त्यानंतर वाहनाचा नंबर आणि वाहनाच्या इंजिन किंवा चासीचे शेवटचे 4 अंक टाकावेत. वाहनावर प्रलंबित असणाऱ्या दंडाची (ई-चलन)ची माहिती घेण्यासाठी “माय ई-चलन’ यावर “क्‍लिक’ करावे. यानंतर वापरकर्ते प्रलंबित वाहतूक दंडाची रक्‍कम क्रेडीट/डेबिट कार्ड किंवा ई-बॅंकिंगद्वारे भरू शकतात.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.