पिंपरी : मकरसंक्रांतीचे औचित्य साधून स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन पिंपरी चिंचवड सहकार्र्यांनी चिंचवड चापेकर चौक येथे हेल्मेट व वाहतुकीचे नियम आणि जनजागृती हा आगळा-वेगळा उपक्रम राबविला.
हेल्मेट परिधान केलेल्या व्यक्तींना तिळगुळाची ट्रॉफी व गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला. मकरसंक्रांतीचे औचित्य साधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. हेल्मेट न घातल्यास होणारे धोके सांगून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
चापेकर चौक येथे स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप व उप प्रादेशिक परिवहन पिंपरी चिंचवडचे पीआय सचिन विधाते, आनंद पाटील, मेडशीकर, भीमराव शिंगाडे, पीआय खैरे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली ब्रह्मे, निरजा देशपांडे, किमया खांदवे, उदय वाडेकर, संतोष शेटे आदी उपस्थित होते.