पुणे – वस्तु आणि सेवा कर (जीएसटी) जाचक तरतुदी व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरत आहेत. व्यापार करणे अवघड बनले आहे. या पार्श्वभूमीवर जाचक तरतुदी रद्द कराव्यात, या मागणीसाठी निवेदन उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना दिले आहे.
यातील जाचक अटीविरोधात कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (कॅट) संस्थेने 26 फेब्रुवारी रोजी देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे.
याबाबत पंतप्रधान यांना निवेदन दिले आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांकडून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी कॅट महाराष्ट्रचे कार्यकारी चेअरमन राजेंद्र बाठिया, कॅट महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कुंभोजकर, सहसचिव रायकुमार नहार आणि दिनेश मेहता उपस्थित होते.