बारामतीतील व्यापाऱ्यांचा सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय

बारामती (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फॅम इत्यादी यांच्या सूचनेनुसार बारामती व्यापारी महासंघाच्या सर्व सदस्य संघटनांनी राज्य शासनाने पुकारलेल्या पुढील 2 दिवस शनिवार व रविवार च्या कडकडीत बंदला पाठिंबा दिला आहे. 

तथापि सोमवार दिनांक 12 एप्रिल 2021 पासून सर्व व्यापाऱ्यांनी आप आपली दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या कालावधीत उघडावीत असे व्यापारी महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारने दिलेल्या कोव्हिडं 19 च्या सर्व नियमांचे पालन करावे. तसेच आपल्या कर्मचारी व ग्राहक यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी.

सदर मीटिंग ला अध्यक्ष नरेंद्र गुजराती, उद्योगपती सचिन सातव, सुशीलसेठ सोमाणी, स्वप्निल मुथा, प्रवीण गांधी, चेतन व्होरा, अभय गादीया, संजय सोमाणी, बाळू चांदगुडे, सुधीर वाडेकर, परेश वीरकर, नरेंद्र मोता, शैलेश साळुंखे, सुरेंद्र मुथा, फकृशेत भोरी, जगदीश पंजाबी, प्रवीण आहुजा, प्रमोद खटावकर, किरण गांधी व इतर अनेक व्यापारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.