पुणे – करोना विषाणूच्या संसर्गामुळे धाकधूक वाढत आहे. परिणामी, खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायजर, हॅंड ग्लोव्हज, मास्क अशा वस्तूंची मागणी वाढली असून, त्यांच्या किंमतीतही दुपटीने वाढ झाल्याचे समोर येत आहे.
करोना विषाणूंच्या संसर्गाबाबत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता राखण्याचा, हस्तांदोलन टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे नागरिक “एन-95 मास्क’, सॅनिटायजर, हॅंड ग्लोव्हज यासारख्या वस्तूंच्या वापरावर भर देत आहेत. परिणामी, या वस्तूंची मागणी वाढली आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन शहरातील व्यावसायिकांकडून वस्तूंच्या किंमतींमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मास्कची किंमत 100वरून 300 रुपये करण्यात आली आहे. तर सॅनिटायजर 20वरून 40 रुपये आणि हॅन्डग्लोव्हज 150वरून 300 रुपये अशी भाववाढ केल्याचे समोर आले आहे.
Shubham, a medical store owner: Hand sanitisers have disappeared from the market. We have given order for it but it has become increasingly difficult to get them. Masks which were earlier sold for Rs 50-60, are now being sold at Rs 100-150. It is being sold even in black. (04.03) https://t.co/v7GkBwdLDk pic.twitter.com/og89Kmo6e9
— ANI UP (@ANINewsUP) March 4, 2020