नवी दिल्ली – कापडावरील जीएसटी वाढऊ या व इतर मागण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) महाराष्ट्राचे शिष्ट मंडळ केंद्रीय उद्योग व वाणीज्य मंत्री पियुश गोयल यांना भेटले.
कॅट महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश भाई ठक्कर म्हणाले की, कापडावरील जीएसटी 5% वरून 12% पर्यंत वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावरी करू नये. वस्त्रोद्योग मंत्रालयाने जीएसटीत वाढीऐवजी कपड्यांवरील सध्याच्या पातळीवर जीएसटी कायम ठेवण्याची सूचना केली आहे. कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोयल यांच्याशी इतर विषयावर चर्चा केली.
कापडावरील वाढीव जाएसटीचा निर्णयय मागे घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. 85% पेक्षा जास्त लोक 1,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे कपडे वापरतात. ज्यावर सध्या 5% जीएसटी आकारला जातो. कापडावरील जीएसटीत वाढ केल्यास त्याचा ग्राहकांवर विपरीत परिणाम होईल आणि जीएसटी विभागासह छोट्या व्यापाऱ्यांचे भांडवलही रोखले जाईल.
शिष्टमंडळाने गोयल यांच्याशी फुटवेअर व्यवसायात जीएसटी तर्कसंगत करण्याबाबत चर्चा केली आणि प्रस्तावित दरवाढीचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. ई-कॉमर्सच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली आणि ई-कॉमर्स नियमांची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी कॅटने आग्रह केला.
या बैठकीला दिल्लीचे अध्यक्ष विपिन आहुजा, राष्ट्रीय सचिव सुमित अग्रवाल, महासचिव आशिष ग्रोव्हर आणि कोलकाता येथील सुधांशू अग्रवाल उपस्थित होते.