ही तर चक्क लूट! रूग्णवाहिकेचे 4 किलोमीटरसाठी 10,000 रु. भाडे; आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केली रिसीट

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात एकाच तांडव निर्माण झाला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सीजन मिळत नसल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच हॉस्पिटलही रुग्णांकडून लाखो रूपये बिलापोटी उकळत आहेत. तर रूग्णाला एका हॉस्पिटलमधून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रूग्णवाहिकावाले सुद्धा लूटमार करत आहेत.

महामारीच्या या काळात एकमेकांना मदत करण्याऐवजी काही लोकांनी यास पैसा कमावण्याचे साधन बनवले आहे. कोरोनाच्या गंभीर रूग्णांच्या मदतीच्या नावाखाली एका रूग्णवाहिकेच्या संचालकाने जे केले ते पाहून लोकांमध्ये राग वाढत आहे.

आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी देशाला हादरवणारे एक छायाचित्र शेयर केले आहे. हे छायाचित्र एका रुग्णवाहिकेच्या बिलाचे आहे. या बिलाचा फोटो शेयर करत त्यांनी लिहिले आहे की, दिल्लीत 4 किलोमीटरसाठी 10,000 रुपये रूग्णवाहिकेचे भाडे. जग आज आपल्याला पहात आहे, केवळ विध्वंस नव्हे, तर आपली नैतिकता सुद्धा.

आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी बिलाचा फोटो शेयर केल्यानंतर अनेक यूजर्स आपल्या वेदना मांडू लागले. कोरोना महामारीमध्ये कशी लुटमार सुरू आहे हे एका यूजरने सांगितले.

त्याने लिहिले, त्यांच्या शेजार्‍याचा मृतदेह 5 किलोमीटर अंतरावरील स्मशानभूमीत नेण्यासाठी 22 हजार रुपये मागण्यात आले होते. यावरून अंदाज लावता येतो की, काही लोक कोरोनाचा कसा फायदा घेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.