पेठ : कुदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील खेड तालुक्यात जाणाऱ्या मिरजेवाडी घाटात ट्रॅक्टर वरील वाहनचालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट घाटातील एका घराजवळ पलटी झाला. त्यात एकजण जागीच ठार तर 3 जण जखमी झाले आहेत.
कुदळेवाडी मिरजेवाडी घाटातून मंचर येथील स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर हा चास (ता. खेड) येथे चालला होता. कुदळेवाडी घाटात गेल्यावर चालकाचा ताबा अचानक सुटल्याने घाटातील ट्रॅक्टर नजीकच्या घरासमोर जाऊन पलटी झाला. मंचर खान वस्ती येथील मचिंदर शिवाजी गावडे |(वय 30 ) याचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेला बापू निवृत्ती कुदळे (वय 33) यांचा हात मोडला आहे. व इतर 2 जणांची नावे समजली नाहीत.
घटनास्थळी सरपंच बाळासाहेब बुट्टे, उषा दिनेश घणवट व खेड पोलीस स्टेशनचे गाढवे व दाते या पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.