कोपनहेगन, (नॉर्वे) – नॉर्वेची राजधानी ओस्लोमधील् एका बंकरमध्ये झालेल्या बेकायदेशीर रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या विषारी वायूच्या गळतीमुळे किमान 25 जणांची प्रकृती बिघडली आहे.
पोर्टेबल जनरेटरमधून कार्बन मोनोक्साईडची गळती झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. वायूगळतीमुळे अस्वस्थ झालेल्यांमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीला गंभीर धोका नसल्याचे नॉर्वेतील एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
रुग्णालयात दाखल केलेल्या पाच जणांपैकी दोघांना अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले आहे, असेही या वृत्तात म्हटले आहे.
या रेव्ह पार्टीसाठी 20 ते 30 वर्षाचे 200 युवक-युवती सहभागी झाले होते. पार्टीतील लाईटींग आणि साऊंड सिस्टीमसाठी डिझेलवर चालणाऱ्या पोर्टेबल जनरेटरचा वापर केला गेला होता. ही पार्टी ज्या बंकरमध्ये झाली होती, तेथे विषारी वायू पसरल्याने अनेकजण गुदमरले होते. सकाळी गस्तीवरच्या पोलिसांना पार्टीतील भेदरलेली मुले दिसल्यावर ही भानगड उघड झाली.