विषारी वायूचा कहर, 12 हून अधिक लोकांच्या डोळ्यात जळजळ अन् श्वास घेण्यास त्रास

नवी दिल्ली – दिल्लीमध्ये वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 15 लाख लोकांचा मृत्यू होतो. वायु प्रदूषणा -मुळे मनुष्याचे आयुर्मान 9.5 वर्षांनी घटले असल्याची माहिती ताजी असतांनाच पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आरके पुरम परिसरात कथित विषारी वायू पसरल्यानं दहशत माजली आहे. या प्रदूषित वायुमुळे  लोकांच्या डोळ्यात जळजळ होत आहे.  तसेच त्यांना श्वास घेण्यास त्रास  होऊ लागला आहे.

तेथील स्थानिकांनी केलेल्या दावानुसार, या परिसर जवळ असलेल्या सीआरपीएफ कॅम्प किंवा एनएसजी कॅम्पमधून विषारी वायू सोडण्यात आला होता. त्यानंतर येथील लोकांच्या डोळ्या ज जळजळ होऊ लागली. आणि  श्वास घेण्यासही  त्रास होऊ लागला. येथील स्थानिकांना समजत नव्हते. काही वेळात १२ पेक्षा जास्त लोक बेशुद्ध पडले.

या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना कळताच पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि 6 रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या. तेथून लोकांना रुग्णालयात नेण्यात आलं. सर्वांची प्रकृती ठीक आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी तेथील स्थानिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.