मनपाकडून टॉवर सील

15 लाख 38 हजार 113 रुपये थकित
नगर –
जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार महापालिका मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांना उद्दिष्टे देण्यात आली असून ते पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या वसूली पथकाकडून एस्सार इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे टॉवर सील करण्यात आले आहे.

त्यांच्याकडे 15 लाख 38 हजार 113 रुपये थकबाकी आहे.
मार्चअखेरपर्यंत प्रत्येक प्रभाग कार्यालयास 10 ते 12 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्टे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. मात्र हे सर्व अधिकारी व कर्मचारी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गुंतले असल्याचे कारण देत वसुलीकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र आता पुन्हा वसुली मोहीम सक्रीय झाली आहे.

बड्या थकबाकीदारांचे नावे फ्लेक्‍स बोर्डवर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अर्थात यापूर्वी महापालिकेच्या संकेतस्थळावर बड्या थकबाकीदारांचे नावे झळकली आहे. अशा 400 थकबाकीदारांला लक्ष्य करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. परंतु ही मोहीम पूर्णपणे ठप्प झाली होती. महापालिकेला उत्पन्नाचे स्रोतमध्ये सर्वाधिक उत्पन्न केवळ मालमत्ताकरातून मिळत असल्याने त्यावर महापालिकेचा आर्थिक गडा चालतो.

त्यामुळे महापालिकेला मालमत्ता कराच्या वसुलीशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यामुळे या दोन महिन्यात वसुली विभागाला जास्तीत जास्त मालमत्ताकराच्या थकबाकीची वसुली करावी लागणार आहे.

त्यानुसार सोमवार (दि.17) एस्सार इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या टॉवरवर महानगरपालिकेची मालमत्ता कराची 15 लाख 38 हजार 113 एवढी थकबाकी असल्याकारणाने साखरबाई मोहनराव झिने यांच्या मालमत्ता वरील टॉवर सील करण्यात आले. ही कारवाई प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक संजय उमाप, अशोक कन्हेरकर, संदीप कोलते, अनिल पवार, अजय कांबळे, पाशा शेख, सागर जाधव यांनी केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.