पुणे : पुण्यात बांधकाम व्यवसायीकाने संरक्षण विभागाची फसवणूक करुन मोठे टॉवर उभारले आहेत. त्याने महापालिकेकडे खोटी माहिती सादर करुन बांधकाम केले. हे प्रकरण एका सामाजीक कार्यकर्त्याने बाहेर काढल्यावर हवाई दलाने विमानतळ पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. मात्र या तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. तर दुसरीकडे संबंधीत बांधकाम हे बेकायदाच असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, लोहगाव येथील सर्व्हे नंबर 211/1/6 आणि 211/1/7 ( संपुर्ण लोहगाव ) हवाई दलाच्या रेड झोन मध्ये येतो. या ठिकाणी बाधंकाम करण्यासाठी हवाई दलाची ( डीफेन्स ) एनओसी बंधनकारक आहे. हवाई दलाची एनओसी मिळाल्यानंतरच महापालिका बाधंकाम सुरु करण्यास परवानगी देते. हवाई दलाच्या रेड झोन मधील बाधंकामाचे नियम कडक असताना ही, एका फर्मच्या दोघा संचालकांनी थेट हवाई दलाचीच फसवणूक केली आहे. खोटी माहीती देऊन या जोडीने हवाई दलाची एनओसी मिळवली. खोट्या माहीतीच्या आधारे मिळवलेली एनओसी वापरुन या दोघांनी हजारो फ्लॅट बाधंले आहेत. विमाननगर ( लोहगाव ) येथे गृह आणि व्यवसायिक प्रकल्प उभारण्यात आला आहे. लोहगाव विमानतळ परीसरात बाधंकाम करण्यासाठी हवाई दलाची एनओसी घ्यावी लागते. बाधंकामाची उंची आणि विमानतळापासूनचे अंतर या एनओसी मधून स्पष्ट होते.
हवाई दलाची एनओसी मिळवण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाचे अंतरासंबधीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. सर्व्हे ऑफ इंडियाच्या अंतराच्या प्रमाणपत्राच्या आधारे हवाई दल एनओसी देते. संबंधीत बांधकाम व्यवसायीकांनी मात्र सर्व्हे ऑफ इंडियाचे खोटे प्रमाणपत्राच्या आधारे हवाई दल एनओसी देते. संबंधीत बांधकाम व्यवसायीकांनी मात्र सर्व्हे ऑफ इंडियाचे खोटे प्रमाणपत्र हवाई दलाला सादर केले. त्याआधारे त्यांनी लोहगाव येथील बाधंकामासाठी हवाई दलाची एनओसी मिळवली. बाधंकाम ही पुर्ण केले. त्यानंतर ही बाब हवाई दलाच्या निदर्शनास आली. हवाई दलाने खातरजमा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हवाई दलाने या संदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हवाई दलाची तक्रार असुनही पोलीसांनी मात्र अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. चौकशी सुरु आहे. चौकशी पुर्ण झाल्यावर काय करायचे याचा निर्णय घेऊ. अशी भुमिका पोलीसांनी घेतली आहे.
दरम्यान, यातील एक पार्टनर हे राज्यातील एका बड्या ” दादा” नेत्याचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ नये यासाठी राजकीय दबाव आणला जात आहे. राजकीय दबावामुळे हे बिल्डर सुटले तर, या गृह प्रकल्पात घर घेतलेल्या हाजारो सामान्य नागरिकांवर मोठा अन्याय होणार आहे.
‘हवाई दलाच्यावतीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. संबंधीत बांधकाम व्यवसायीकास चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. त्याने दिल्लीला असल्याचे सांगितले असून थोड्याच दिवसांत कागदपत्रे सादर करणार आहे.’
-गजानन पवार( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ)