पर्यटकांना सिंहगडाचे वेध; आठ दिवसांत तब्बल पाच हजार वाहनांची गडावर “कूच’

पुणे  -शहरातील पर्यटनासाठीचे मुख्य आकर्षण असलेला सिंहगड 12 ऑक्‍टोबरपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला झाला. आठच दिवसांत हजारो नागरिकांनी गड सर केला. यावेळी वनविभागातर्फे तब्बल 4925 वाहनांकडून एकूण 3 लाख 8 हजार 800 रुपये इतके उपद्रव शुल्क वसूल केले.

करोना आणि लॉकडाऊनमुळे पर्यटनावर बंदी घातली होती. तब्बल 18 महिने सिंहगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद होते. गडाचे दरवाजे लवकरात लवकर पुन्हा खुले व्हावे, अशी अपेक्षा अनेक नागरिक व्यक्‍त करत होते. अलीकडील काळात विषाणू संसर्गात लक्षणीय घट झाल्याने जिल्ह्यातील पर्यटनावरील बंदी उठवली.

दि. 12 पासून सिंहगडाचे दरवाजे खुले झाले. त्यातच 15 तारखेला दसरा आणि लॉंग वीकेंडचा मुहूर्त साधत नागरिकांनी सिंहगडाला भेट देत पर्यटनाचा आनंद लुटला. गडावर येणाऱ्या नागरिकांना उपद्रव शुल्कापोटी वनविभागातर्फे काही शुल्क आकारले जाते.

या उपद्रव शुल्कात वाढ करून दुचाकीसाठी 50 रुपये, तर चारचाकीसाठी 100 रुपये आकारले जात आहे. वनविभागाच्या नोंदीनुसार, गेल्या आठ दिवसांत गडावर एकूण 4925 वाहनांनी

हजेरी लावली. त्याच्यांकडून उपद्रव शुल्कापोटी एकूण 3 लाख 8 हजार 800 रुपये वसूल केले. गडावरील वर्दळीमुळे जैवविविधतेला होणारा उपद्रव लक्षात घेता हे शुल्क घेत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.