नगर, (प्रतिनिधी) – चांदबिबी महालावर पर्यटक भेट देण्यासाठी येतात. चांदबिबी महालावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. पर्यटक आणि मॉर्निंग वॉकला फिरण्यासाठी येणार्या नगरकरांना त्यांचा त्रास होत होता. यासाठी जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन देताच त्यांनी हे काम मार्गी लावले.
रस्ते चांगले असले तर याठिकाणी आणखी पर्यटक येतील, आणि कोणतेही अपघात होणार नाही, त्यामुळे उर्वरित रस्त्याचे काम काम लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे करण्यात आली.
चांदबिबी महालावरील रस्ता करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांचा चांदबिबी मॉर्निंग ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला. तसेच उर्वरित रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लागावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मोहन लुल्ला,
अजय झिंजे, हर्षल म्हस्के, दादा भाकरे, विशाल वालकर, गुल्लू मामू, महेश कुलट, नरेंद्र लोळगे, हर्षल जोशी, अभय मुथा, दिलदारसिंग बीर, प्रवीण गुंजाळ, रमेश कोल्हे, राजेंद्र औटी, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, मुनाफ, आदित्य बोराटे, अमित बोराटे, व मॉर्निंग ग्रुपचे इतर सदस्य देखील उपस्थित होते.