भाटघर धरण परिसरात पर्यटकांचा ओघ

भाटघर-भोर तालुक्‍यात दोन धरणे, किल्ले, राजवाडा असल्याने रविवारी व सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाटघर धरण परिसरात पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे याभागात पर्यटक, नागरिकांचा ओघ वाढू लागला आहे.

येथील भोर – कापूरहोळ रस्त्यावर नेहमीच अस्ताव्यस्त वाहने पार्कींग केल्याचे दिसून येत आहे. भोर – पुणे प्रवासासाठी या रस्त्याचा उपयोग केला जातो. या मार्गावर रविवारी व सुटीच्या दिवशी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. या रस्त्यावर सांगवी गावच्या शेजारी भाटघर धरण आहे. धरणाची साठवण क्षमता 23.75 टीएमसी एवढी आहे. यावर्षी दमदार पाऊस झाल्याने धरणामध्ये सद्यस्थितीत 21 टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने वीर धरणाला अति फुगवटा निर्माण झाला होता. यामुळे भाटघर पॉवर हाऊसमध्ये पाणी शिरले होते. सद्यस्थितीत भाटघर पॉवर हाऊसचे काम सुरू असल्याने धरणाच्या दरवाजांमार्फत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटक व यात्रेकरू याकडे आकर्षित होत आहेत. पर्यटक व यात्रेकरू सदर रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्त पार्किंग करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर कोंडी निर्माण होते. धरणाचे सौंदर्य पाहण्यासाठी सद्या गर्दी होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.