‘तौक्‍ते’ वादळाचे राज्यात आठ बळी; तीन हजार घरांची पडझड

अलीबाग/ रत्नागिरी/ सिंधुदूर्ग/ मुंबई, – तौक्‍ते चक्रीवादळाने कोकणात हाहाकार माजवला. सुमारे तीन हजार घरांचे नुकसान झाले असून राज्यात आठ जणांचे बळी पडले. वादळ गुजरातच्या दिशेने सरकल्यानंतरही या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात रात्री उशीरापर्यंत सुसाट्याचा वारा आणि मुसळधार पर्जन्यवृष्टी होत होती.

अनेक गावातील वीज गायब झाली असून जनावरांच्या गोठ्यामचे पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी घराच्या भींती कोसळल्या. वीजेचे खांब कोसळल्याने अनेक भागात वीज गायब झाली. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सायंकाळी सुरू करण्यात आले. मुंबईतही अनेक घरात पाणी शिरले. महत्वाच्या रस्त्यांना अक्षरश: नद्यांचे स्वरूप आले होते. सिंधुदुर्गात दोन, रायगडमध्ये तीन आणि ठाणे जिल्ह्यात तीन जण मरण पावले.

महाड येथून आलेल्या माहितीनुसार तालुक्‍यात वादळाचा 60 गावांना जोरदार फटका बसला. तालुक्‍यात 175 घरांचे आणि आठ गोठ्यांचे नुकसान झाले. वीज पुरवठा आणि संपर्क यंत्रणा खंडीत झाल्याने रात्री उशीरापर्यंत पूर्ण तपशील प्राप्त होऊ शकला नाही. तालुक्‍यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वादळाची तीव्रता विचारात घेवून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून एक हजार 80 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. घरांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अलिबागहून आलेल्या वृत्तानुसार ज्ल्हियात सोमवार दुपारपर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एक हजार 784 घरांचे अंशत: नुकसान झअले. 5 घरांचे पूर्णत: कोसळली. एकूण तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण दोन हजार 299 कुटुंबांचे म्हणजे 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे. महावितरणच्या 314 खांबांचे आणि एका ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरीतत पंचनामे सुरू
रत्नागिरी वार्ताहराने दिलेल्या बातमीनुसार, जिल्ह्यात सरासरी 132.11 मिमी पावसाची नोंद सोमवारी दुपारपर्यंत झाली. जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 52 मिमी , दापोली 82 मिमी, खेड 49 मिमी, गुहागर 120 मिमी, चिपळूण 100 मिमी, संगमेश्वर 142 मिमी, रत्नागिरी 274 मिमी, राजापूर 208 मिमी, लांजा तालुक्‍यामध्ये 162 पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्‍यात 200 घरांचे, दापोली तालुक्‍यात 350 घरे, खेड तालुक्‍यात 30 घरांचे, गुहागर 05 घरे, चिपळूण 65 घरे, संगमेश्वर 102 घरे, रत्नागिरी 200 घरे, राजापूर 32 असे एकूण जिल्ह्यात 1028 घरांचे तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागर येथे 1, संगमेश्वर येथे 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 व्यक्ती जखमी झाल्या गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वर मध्ये 1 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधनाची जीवितहानी झअली. जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली. 14 दुकाने, नऊ शाळा आणि 21 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.

वादळामुळे राजापूर तालुक्‍यात 652 व्यक्ती, रत्नागिरी तालुका 363, दापोली तालुका 2373, मंडणगड तालुका 508, गुहागर तालुका 667 असे एकूण 4563 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार कोणत्याही मच्छिमार बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत.

सदरचा अंदाज हा प्राथमिक स्वरुपाचा असून 17 मे 2021 रोजी पासून संबंधित तहसिलदारांमार्फत प्रत्यक्ष पंचानाम्याला सुरुवात करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

चक्री वादळ, वीज पुरवठा गोषवारा

रत्नागिरी जिल्ह्यातील चक्रीवादळ परिस्थिती मुळे वीज प्रणाली बाधित झाली त्याचा दिनाक 17 मे दुपारी 3 वाजता गोषवारा.

1 एकूण गावे 1239 पैकी 760 बंद 479 सुरू

2 एकूण उपकेंद्रे 55 पैकी 27 सुरू 28 बंद

  1. ट्रान्सफॉर्मर 7548 पैकी 1883 सुरू 5665 सुरू होणे बाकी

  2. एकूण वीज कनेक्‍शन 545120 पैकी 187711 सुरू 357409 सुरू होणे बाकी

  3. कढ पोल 164 बाधित

  4. ङढ पोल 391 बाधित

  5. कढ लाईन नादुरुस्त 49 किलोमीटर

  6. ङढ लाईन नादुरुस्त 117 किलोमीटर

  7. ट्रान्सफॉर्मर 15 नादुरुस्त.

  8. मनुष्यबळ, कंपनी चे 71 माणसे 910, कंत्राटी 33 टीम माणसे 304

वरील माहिती आत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार आहे. यात आणखी वाढ होऊ शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.